कसा बसा परीक्षेचा दिवस उजाडला ...... दिनु तसा भीत भीत परीक्षेला गेला ....................
अभ्यास तसा जेम तेम केलेला .... जेव्हढे आठवले तेव्हढे लिहिले आणि परीक्षा संपवून घरी आला .... असे एक - दोन करत करत ... सात पेपर लिहून झाले परीक्षा संपल्या,
दिनु तसा थोडासा घाबरलेला होता.... मग आज त्याचा परीक्षेचा निकाल होता ना, पिसाळ सर सर्वांना बोलवून बोलवून हातात पेपर देत होते ... दिनुला पण बोलावले, दिनु भीत भीत सरांजवळ गेला आणि सरांनी काहीही ना बोलता दिनुच्या हातावर पेपर ठेवले, त्यांचा चेहरा निर्विकार होता ............... दिनुला काही सुचत नव्हते ... त्याने पेपर घेतले आणि आपल्या जागी येउन बसला सुरुवातीची १० मिनट त्याने पेपर बघितलाच नाही भीतीने .... पण बघावे तर लागणार होते ना ...
शेवटी हिम्मत करून त्याने पहिला पेपर बघितला मराठी चा होता तो .... पास झाला त्यात दिनु ........ ज़रा भीती कमी झाली ४० पैकी ३३ गुण पडले त्याला .... नंतर हिंदी चा पेपर होता ... या पेपर ची भीती नव्हती त्याला हिंदी विषय चांगला होता त्याचा ४० पैकी ३१ गुण पडले त्याला... वाह दिनु वाह दिनु ज़रा आता लाडात आला होता दोन्ही विषयात चांगले गुण पडले होते त्याला ना, आता तीसरा पेपर त्याने बघितला इंग्लिश चा होता तो ... परत आपला दिनु घाबरला ..... कारण त्य्ताला आठवले दिलीप जाधव सर खूप मारायचे.... अग आई ग हृदया मध्ये कळ भरून आली, परत भीत भीत त्याने पेपर बघितला ... आता त्याचे डोळे बटाटया एव्हढे झाले होते ... ४० पैकी २७ गुण ... दिनु भाऊ अगदी उडालाच बेंच वर ..... सवारी खूषित होती साहेबांची ...... पण अजुन ४ पेपर बाकी होते बघायचे, त्याने ज़रा वर्गात नज़र फिरवली ... काही हसत होते आणि मागच्या बेंच वरचे ज़रा उदास होते .... असणारच ना ... त्यांचे राहू दे आपण दिनुचे बघू काय...............??
त्याने हळूच चौथा पेपर उघडला .... छातीत धक् धक् सुरु झाले होते त्याच्या पुढचा पेपर विज्ञान चा होता आणि आता तर दिनु भलताच हादरला होता .... कारण ही तसेच होते त्या मागचे कारण साहेब पास झाले विज्ञान मध्ये पण ४० पैकी ३१ मिळाले होते.......... आता इतिहास चा पेपर होता पुढचा त्यात पण पास २० पैकी १४ गुण आणि भूगोलात पण २० पैकी १५ गुण आणि एकून चाळीस पैकी २९ गुण मिळाले साहेबांना आता शेवटचा पेपर होता गणिताचा............आता खरी मज्जा होती आणि कसोटी पण होतीच की............. एक आठवडया ची मेहेनत आता दीसून येणार होती ..... त्याने परत धक् धक्त्या हृदयाने पेपर उघडला ... आणि......................
Saturday, September 26, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)

5 comments:
dinu khupach hushar ahe...
waaa dinu shabass
अरे वाह खूपच हुशार आहेत साहेब
एका आठवड्याच्या तयारीने असे गुण चांगली गोष्ट आहे कि
tasaa tu hushar aahes re
evhdhe chhaan kase lihitoys re
kiti re suspense story aahe hee
Post a Comment