.................कसे आपले शौक पूर्ण करावे ह्याची त्याला आता चिंता लागुन राहिली होती........ आणि एक दिवस जे न घडायचे होते ते घडले.
आता परत नविन काय बुवा................!!! दिनु ला आपल्या सवयी भागवण्या साठी पैश्यांची गरज होती ना !!! असाच बसलेला असताना त्याचे लक्ष्य घरातल्या फ्रीज वर गेले .......... तीथे आईने पन्नास रुपयांची नोट ठेवली होती ........... आणि दिनु चे लक्ष्य आता त्या नोट वर होते. आणि त्याने कोणाच्याही नकळत ती गप्प चूप उचलली. हो ...........दिनु ने वाईट कृत्य केले होते आणि ते ही आयुष्यात पहिल्यांदा ............. खूप अश्या गोष्टी असतात की ज्या आयुष्यात पहिल्यांदाच घडतात, आणि नंतर बऱ्याचदा......!!! असेच काही तरी दिनु बरोबर घडत होते........ तो जणू भर्कटत चालला होता .... कुठे अणि कसा हे त्यालाही कळत नसावे......... आता ह्याला नादानी समजावी का मूर्ख पणा ह्या सर्व गोष्टींच्या पलिकडे जात होता आपला दिनु............!!!
नंतर त्याला ह्या गोष्टीचा पश्चाताप झाला आणि दिनु ने ठरवले की परत असे कृत्य कधीच करायचे नाही. दिनु निराश होता ते ठीक होते, पण आता त्या निराशेला एक वेगळेच वळण प्राप्त झाले होते........!!! ह्या साठी तो स्वतः कारणीभूत होता ...... इतर कोणीही नाही, आणि असू पण शकत नाही आणि नव्हतेच .........!!!
आता दिनु ची अभ्यासात पण अधोगति होत होती. त्याला वेळ आणि पैसे मिळाले की तो सिगरेट ओढत असे. त्याचे अभ्यासात लक्ष्य लागत नव्हते ........दिनु परीक्षेत नापास होऊ लागला, घरच्यांच्या आणि शिक्षकांच्या रोषाला तो सामोरा जात होता .......... मान खाली घालून ........ तरी पण तो सुधरला नव्हता ......... !!!
त्याच्या पण मनाला काही गोष्टी टोचत होत्या .... खुणावत होत्या त्याला की................
Monday, October 19, 2009
Friday, October 2, 2009
गोष्ट एक मुलाची दिनुची.............Part-14
......................दिनु आता घराकडे निघाला होता आणि नजरेत एक विलक्षण भाव दीसत होता त्याच्या........ तो आता घरी आला होता .............
जरा थकलेला होता दीसत होता तो .... आईने त्याच्या विचारले..'' काय झाले रे एव्हढा निराश का दिसतोस??'' त्याने उत्तर टाळले आणि गप्प हात पाय धुवून बसला ...... तेव्हढ्यात त्याच्या आईला काही तरी वास आला ........'' काय रे कसला वास येतोय तुझ्या अंगाला?'' .... '' अं काय काही नाही ग ...!!'' आणि दिनु ला आठवले अरेच्या आपल्या तोंडाला तर सिगरेट चा वास येत असणार. तो पटकन उठला आणि मोरी मध्ये पळाला आणि तोंड धुण्याचे नाटक करीत कोलगेट ने लगेच दात घासले सप्प सप्प करत आणि चूळ भरली ......... '' ह्म्म्म आता नाही ना येत ग वास..??'' दिनु आईला म्हणाला .......... '' नाही का रे काय खाल्लेस??'' .......... '' काही नाही ग तीथे बाहेर खूप धूर झाला होता ना मघाशी कदाचित त्याचा वास राहिला असेल अंगाला ....!! दिनु आईशी खोटे बोलला होता आता ही पण एक नविन सुरुवात म्हणावी का?? ......... तसेच म्हणावे लागेल.
आता दिनु सिगरेट रोज पीत होता आणि सारखा.......... शाळेत जाताना येताना आणि एव्हढेच नव्हे तर मधल्या सुट्टीत पण.......... गप्प चूप यार्ड मध्ये जाउन तो सिगरेट पीऊ लागला होता. हळू हळू त्याने एक सिगरेट पीत असलेल्या मुलांशी मैत्री केली आणि बिनधास्त पणे सिगरेट पीऊ लागला................. काय मज्जा वाटायची त्याला काय माहीत??......... पण तो रश्मी ला नाही विसरु शकला होता.......... रोज तीला चोरून बघायचा .... पण बोलायचा प्रयत्न मात्र कधीच केला नाही त्याने तीच्याशी .......... कारण तीचे शब्द आठवायचे त्याला.....'' मला नाही माहीत .. मी नाही सांगू शकत काहीच .. आताही नाही आणि कधीही नाही.....प्लीज़ मला त्रास नको देउस.........!!'' आणि तो गप्प बसायचा .... खरे प्रेम करायचा तो तीच्या वर आणि आताही करतो ........ जर का हे रश्मी पण वाचत असेल तर कदाचित तीला तीची चूक कळून येईल...... येईल का?? काय माहीत काय सांगावे कदाचित तीची चूक नसावी .......... आणि बहुधा नव्हतीच ... ते दोघेही तसे बघायला गेलो तर लहानच नाही का?? ............. असो पण आपल्या दिनु बाळाला हे कोण सांगणार ??
त्याला आता सिगरेटची सवय झाली होती..... त्या शिवाय त्याला करमायचे नाही.......... कधी कधी पैसे पण कमी पडत त्याला ... मग त्याचे दुसरे मित्र होते ना सिगरेट पीणारे... त्यांच्या बरोबर अर्धी अर्धी करून पीत असे मग......... !!!! दिनुचा अभ्यास ही आता खालावला होता. आता तो पूर्वी सारखा हुशार किंवा सदगुणी दिनु राहिला नव्हता..... रोज त्याला आई आणि बाबा ओरडत असे आणि शाळेत शिक्षक लोक सुद्धा त्याच्या अभ्यासा बद्दल नाखुश होते .......... असणारच ना!!
आता तर आई त्याला वर खर्च पण देत नसे ........... आता आली का पंचाईत ... सिगरेट कशी प्यावी ..... आणि मित्रच ते किती दिवस त्याला फूकट सिगरेट पाजणार...... मग काय करावे.... कसे आपले शौक पूर्ण करावे ह्याची त्याला आता चिंता लागुन राहिली होती........ आणि एक दिवस जे न घडायचे होते ते घडले ..............

Thursday, October 1, 2009
गोष्ट एक मुलाची दिनुची.............Part-13
....... मध्येच उठला आणि त्याने काही तरी विचार केला मनामध्ये आणि त्या यार्ड च्या बाहेर पडला दुकानावर जाउन त्याचे पाय थांबले होते, त्याची नज़र काहीतरी शोधत होती.... त्याचे होठ काही तरी बोलायला थरथरत होते........ तो बोलला................
'' काका... काका .... एक सिगरेट दया.........'' दिनु दुकानदाराला बोलत होता ..... हो आपला दिनु बाळ आता सिगरेट पिणार होता ...... का? कारण तो उदास होता म्हणुन.....?? का तो बेचैन होता म्हणुन...???
त्याने त्या दिवशी मित्रांचे बोलणे ऐकले होते की सिगरेट पिल्यावर टेंशन कमी होते..... अच्छा तर आपल्या दिनु बाळाला टेंशन आले होते तर, आणि ते कमी करण्यासाठी आपला दिनु हा आता सिगरेट पिणार होता .......... काय म्हणावे आता ह्याला .......... दुकानदाराने त्याला खालून वर व्यवस्थित बघितले.....'' कुठली देऊ ....?? आणि ज़रा हेकट आवाजात बोलला त्याच्या आवाजा मध्ये तिरस्कार जाणवत होता ......... '' ती दया ती आहे ना क्लासिक मार्लबोरो आहे ना ती वाली .........!!'' दिनु ने त्याच्या मित्रांना ही सिगरेट पिताना बघितली होती. म्हणुन त्याला ही लगेच नाव लक्ष्यात आले ......... दिनु आता सिगरेट घेउन यार्डात परत आला होता .. त्याने इकडे तिकडे पाहिले तर थोडीशी गर्दी होतीच ... पण ओळखीचे कोणी दीसत नव्हते ... तरी दिनु ने उगाचेच रिस्क नाही घेतली आणि एका भिंतीच्या मागे आडोश्याला जाउन बसला ... थोडासा अंधार होता तीथे आणि दिनुचा चेहरा ही त्या अंधारात कोणाला नीट दिसला नसता........... आता सिगरेट कशी पेटवायची ??? हा एक मोठा प्रश्न होता त्याच्या समोर ......... आणि मध्येच त्याला ''अंधा कानून'' ह्या चित्रपटातला रजनीकांत आठवला, तो कसा सिगरेट पेटवून पीतो ते आठवले आणि प्रयत्न केला.......... पहिले दोन प्रयत्न अयशस्वी ठरले आणि तीसरा प्रयत्न थोडा लागू पडला आणि एकदाची सिगरेट पेटली..... पहिला झुरका मारून बघितला त्याने आणि बाप रे खोकु लागला दिनु ........... नाका तोंडातून धुर बाहेर पडला आणि डोळ्यातुन पाणी पण आले पहिलाच प्रयत्न होता ना त्याचा ....... त्याने सावरले स्वतः ला आणि दूसरा झूरका ज़रा नीट मारला एकदम हळूच आणि आता त्याला ठसका लागला नव्हता ........... असे करत करत त्याने सर्व सिगरेट संपवली आणि दिनु ला जणू सिगरेट पीउन मज्जा आली असे भाव उमटले त्याच्या चेहऱ्यावर ..!!!
दिनु आता घराकडे निघाला होता आणि चेहऱ्यावर एक विलक्षण भाव दीसत होता त्याच्या........ तो आता घरी आला होता .............

Wednesday, September 30, 2009
गोष्ट एक मुलाची दिनुची.............Part- 12
..................रस्त्यावर दिव्याचे खांब असतात ना त्याचा अंधुक प्रकाश पडत होता तीच्या वर आणि किती सुंदर दीसत होती ती त्या प्रकाशात .... जशी चांदनी चमकावी एखादी .......
''अरे बोल ना काही तरी ...........!!!'' .....रश्मी दिनु ला उद्देशून बोलली ... '' रश्मी........रश्मी... रश्मी आय लव यू .......... माझे तुझ्या वर खूप प्रेम आहे....!!'' .......... अखेर दिनु भाऊ आय लव यू बोलले एकदाचे.... आता पुढे काय.........??? रश्मी च्या नजरेत तो उत्तर शोधत होता ... '' बोल ना रश्मी मी तुला आवडतो का??'' ....... दिनु परत बोलला तीला ...'' आता नसेल सांगायचे तर नंतर सांग... चालेल मला पण आता काही तरी बोल... मी आवडतो का तुला???''..... दिनु जीवाच्या आकांताने भाउक होउन बोलत होता .... तेव्हा रश्मी हळूच दबक्या आवाजात बोलली .. '' मला माहीत नाही ''...................'' माहीत नाही .........??? .. म्हणजे नेमके काय ... तुला वेळ हवा आहे का??'' .. दिनु बोलला हताश होउन थोडासा.....'' मला नाही माहीत .. मी नाही सांगू शकत काहीच .. आताही नाही आणि कधीही नाही.....प्लीज़ मला त्रास नको देउस.........!!''..... अरे बापरे ........ रश्मीच्या तोंडून हे शब्द ऐकून दिनुचा तोल जायचाच बाकी होता .......... पण सुनील ने सावरले त्याला... खूप हताश झाला होता तो.... होणारच ना !!! काय काय विचार केला होता त्याने ... त्याच्या सर्व स्वप्नांवर पाणी पडले होते.....रश्मी निघून जात होती तीथुन ... आणि आपला दिनु हताश खिन्न आणि उदास मुद्रेने तीची पाठमोरी आकृति त्याच्या नजरेतून दूर जाताना पाहात होता ........ अतीव यातना होत होत्या त्याच्या मनात .......... सुनील ने त्याला धीर दीला आणि ते परत घराकडे जाऊ लागले ............... सगळे संपले होते.......... दिनु ची आपल्या पहिल्या प्रेमात निराशे सकट हार झाली होती ....... दिनु चे पहिले वहीले प्रेम अधूरे राहिले होते..... '' सुनील तू घरी जा, मी आलोच थोड्या वेळाने ........'' दिनु सुनील ला उद्देशून बोलला .... आणि सुनील ही गप्पचुप त्याला, सोडून गेला त्याला माहीत होते की, आता बोलून काय फायदा नाही दिनु ला समजावने कठिन आहे खूप ......
दिनु निघाला तिथून सरळ बांद्रा टर्मीनस यार्ड मध्ये गेला संध्याकाळची वेळ होती.......तशी यार्ड मध्ये खूप गर्दी असायची ह्या वेळी आजही होतीच ..............आणि दिनु शांत बसला होता खूप ....... मध्येच उठला आणि त्याने काही तरी विचार केला मनामध्ये आणि त्या यार्ड च्या बाहेर पडला दुकानावर जाउन त्याचे पाय थांबले होते, त्याची नज़र काहीतरी शोधत होती.... त्याचे होठ काही तरी बोलायला थरथरत होते........ तो बोलला................

गोष्ट एक मुलाची दिनुची.............Part- 11
...........दिनुच्या पावलांची हालचाल वाढली ......... त्या गल्लिचे टोक जवळ आले आणि दिनु तीला हाक मारायला पुढे सरसावला ... रश्मी ... रश्मी ...............!!!
ती थांबली तीने वळून मागे बघितले ............तसा दिनु पुढे सरसावला आणि त्याने रश्मीच्या जवळ जाउन एक मोठासा सुस्कारा टाकला ......... दमला नव्हता तो.... पण त्याला ज़रा दडपण पण आले होते ना....येणारच आयुष्यातला पहिला वहिला प्रेम प्रस्ताव [प्रपोज] मांडणार होता तो .................. रश्मी पण थोडीशी घाबरली होती. दिनु काही बोलणार इतक्यात तीची मैत्रिण मध्येच बडबडली ...'' काय आहे .. का थाम्बव्लेस आम्हाला??'' थोडासा त्रासिक आव आणून म्हणाली होती ती ........... दिनु अगोदर ज़रा दचकला पण तीच्या बोलण्याचा त्याला खूप राग आला होता ... पण काही बोलला नाही तीला ............ बोलू पण शकत नव्हता काहीही ... त्याने फकत एकदा रागाने तीच्या कड़े बघितले आणि परत रश्मी कड़े आपली नज़र वळवली ....... परत ती मैत्रिण मध्ये टपकली...'' का त्रास देतोस आम्हाला, आम्हाला क्लासला जायचे आहे उशीर होईल .... चल ग रश्मी आपण जाउया..!!!''
दिनु च्या तळपायाची आग आता मस्तकात गेली ..... त्याचा चेहरा बघून तरी तसेच वाटत होते ...... इतका वेळ शांत बसलेली रश्मी पण आता म्हणाली .....'' तुझे नाव दिनेश ना?''...............दिनेश चा राग कुठल्या पळाला .. कारण रश्मी त्याच्याशी पहिल्यांदाच बोलली होती किती खुश झाला होता तो ....... आता त्याचा चेहरा कसा प्रफुल्लित झाला होता ......... लब्बाड कुठला .........एव्हढ्यात रश्मी परत बोलली ..... '' तुला काही काम आहे का? आम्हाला क्लास ला जायचे आहे ....... आम्ही जाऊ का?''.......... वाह काय गोड शब्द कानावर पडले तीचे ...असे वाटले की काहीच बोलू नए तीला असेच ऐकत बसावे ... मी गप्प तीला न्याहाळत बसावे आणि तीने हसावे आणि बोलत रहावे ....'' अरे बोल ना काहीतरी असा गप्प का?'' रश्मी आता वैतागली होती ........इतका वेळ शांत उभा राहिलेला सुनील आता जवळ आला आणि त्याने दिनुला डोक्यावर टपली मारली .. '' टप्प '' असा आवाज आला आणि दिनु भानावर आला .. '' हा काय झाले ?'' ... दिनु सुनील ला उद्देशून म्हणाला ... '' अरे काय झाले काय ?? ......... बोल काहीतरी ...!!'' सुनील म्हणाला दिनुला. दिनु बोलला ... '' अं... आ .. आ ... हो हो ... बोलतो ना..!!''............ आणि त्याने रश्मी कड़े बघितले.....ती पण त्याच्या कडेच बघत होती ........ निर्विकार चेहरा होता तीचा .. किती सुंदर वाटत होता ....... त्या अंधार्या गल्लीत पण ... किती छान दीसत होती ती ......... रस्त्यावर दिव्याचे खांब असतात ना त्याचा अंधुक प्रकाश पडत होता तीच्या वर आणि किती सुंदर दीसत होती ती त्या प्रकाशात .... जशी चांदनी चमकावी एखादी ....

Tuesday, September 29, 2009
गोष्ट एक मुलाची दिनुची.............Part- 10
.........नाही नाही दिनु घाबरला नव्हता पण काही प्रॉब्लम आला तर करायचे काय? हा विचार त्याच्या मनात डोकावला आणि दिनु परत शांत बसला ........!!!
दिनु शांत बसला ........... पण .... पण फकत दोनच दिवस .....!!! ह्म्म्म तसा त्याने सुनील ला बरोबर घेतले आणि निघाला, रश्मीला आपल्या प्रेमा बद्दल विचारायला ............. तो चालत होता आता जास्त काही दूर नव्हते पण ते अंतर ही त्याला खूप लांब वाटत होते .......... सुनील हा त्याचा जवळचा मित्र होता त्याला मूली पटवाचा चांगला अनुभव होता तसे त्याने दिनुला पण थोडीशी माहिती दिली होती ... पण दिनुच्या ती माहिती डोक्यावरुण गेली होती ......तो वेगळाच विचार करत होता ... त्याच्या छातीत धक् धक् होत होते ........ हृदयाची स्पंदने जणू घड्याळाच्या ठोक्या प्रमाणे त्याला भासत होती ........त्याच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. त्याच्या समोर अचानक ते मनोज चे प्रेम प्रकरण आठवले.........तसे तर काही होणार नाही ना ???? छे छे .... म्हणत त्याने स्वतःला सावरायचा प्रयत्न केला....छे छे मी त्या मनोज सारखा नाही मी लपून छपून सर्व करायला मी प्रेम करतो तीच्यावर .... पण .. पण ती करत असेल का??.......... ती जर नाही म्हणाली तर.....!!! तीने तीच्या घरी वगैरे सांगितले तर ..... त्या मुलीच्या आईने मनोज च्या श्रीमुखात भडकावलेले दृश्य त्याला आठवले .........क्षणात दिनुसमोर असे किती तरी विचार येउन गेले, तरी तो चालत होता ...........आता काहीही होऊ दे मागे नाही हटायचे, जी होईल त्याला सामोरे जायचे .. आपण काही भ्याड नाही आपण काही चुकीचे पण करत नाही .... ना !! मग का घाबरायचे असे विचार करता करता दिनु आता रश्मी राहते तीथपर्यंत येउन पोहोचला होता ... ज़रा आडोसा घेउन तो उभा राहिला होता .......... रश्मी आणि तीची मैत्रिण क्लास साठी निघाल्या होत्या.
दिनु आणि सुनील त्यांच्या मागुन निघाले ...... रश्मीला काहीतरी वाटले आणि तीने हळूच मागे वळून बघितले आणि त्याला मागाहून चालत येणारा दिनु दिसला ........... दिनु जागीच थबकला ..आता..... आता काय तीला माहीत पडले होते की मी आहे म्हणुन............ मग .... त्याने सुनील कड़े बघितले त्याने म्हणजे सुनील ने त्याला पुढे व्ह्यायला खुणावले आणि दिनेश जरासा दचकून पण सावध होउन पुढे चालत राहिला ........... रश्मी ने त्याला बघून पण पुढे तशीच चालत राहिली काही बोलली नाही........... तीने तिच्या मैत्रिणीला पण ते सांगितले आणि तीने पण दिनुला मागून येताना बघितले.......... तरीही दिनु चालत होता आणि त्याच्या मागून सुनील ही येत होता .... त्यांना माहीत होते की पुढच्या गल्लीत अंधार असतो आणि तिकडे कोणाचा त्रास होणार नाही ........... दिनुच्या पावलांची हालचाल वाढली ......... त्या गल्लिचे टोक जवळ आले आणि दिनु तीला हाक मारायला पुढे सरसावला ... रश्मी ... रश्मी ...............

गोष्ट एक मुलाची दिनुची.............Part-9
हा हा म्हणता शाळा सुरु झाली होती. आणि नववीतला दिनु अभ्यासाला लागला पण लक्ष्य लागत नव्हते कश्याताच त्याचे......... कसे लागणार म्हणा....?
त्यात भर म्हणजे आता त्याला त्याचे मित्र पण पीडू लागले होते तीच्या नावावरून, त्याला ते आवडायचे नाही शेवटी दिनु चे पहिले प्रेम होते ना ते .............!!! त्याची आता मित्रांबरोबर हुज्जत होऊ लागली त्या विषयावरुण .... दत्तात्रेय नावाचा त्याच्या वर्गात एक मुलगा होता तो पण रश्मी वर लाइन मारायचा .... दिनुला ते आवडायचे नाही ...त्याच्या बरोबर सारखे भांडन व्ह्यायचे दिनुचे आणि त्याचे ...........दिनु आता खूप रागीट स्वभावाचा मुलगा बनला होता त्याला लगेच राग येत असे आणि त्याचे पर्यावसन मारा मारी आणि हमरी तुमरी वर येत असे ............ हा फार मोठा बदल दिनु मध्ये झाला होता .. तो काहीसा आक्रामक वृत्तीचा झाला होता. घरी पण तो सरळ बोलत नसे .........आई वडिल पण आश्चर्य चकित झाले होते त्याच्यातील ह्या बदला मूळे ... पण त्यांनी कारण जाणून घ्यायचा प्रयत्न कधी केलाच नाही आणि केला जरी असता तरी दिनु थोडेच त्यांना खरे सांगणार होता.
दिनुचे काही मित्र व्यसन करीत असत ... दिनु त्यांचा राग करायचा आधी ...पण आता तो त्यांच्या बरोबर हिंडू फिरू लागला होता. कळत नकळत त्याला पण वाटायचे की एक सिगरेट ओढून बघावी आपण पण .......... पण नाही ओढली त्याने त्यावेळी. त्याची हिम्मत नसेल झाली......... नाही झाली तेच बरे होते.......... त्याच्या साठी!!!
खार रोड मध्ये जीथे दिनु रहायचा तीथे त्याच्या गल्ली मध्ये एक सुनील नावाचा त्याचा मित्र होता त्याच्या मदतीने दिनु ने रश्मी ला एकांतात गाठून तीच्या समोर प्रेमाचा प्रस्ताव मांडायचा असे ठरवले. पण अडचन पण होती त्या प्लान मध्ये की, रश्मी च्या मैत्रिणी तीच्या बरोबर नेहमी असायच्या.........!!! आता काय करावे...??? लोचा होणार जर तीला म्हणजे रश्मी ला आपण प्रेमा बद्दल विचारलेले आवडले नाही तर..........??? तीच्या मैत्रिणीने वगैरे आरडा ओरड वगैरे केली तर.........??? नाही नाही दिनु घाबरला नव्हता पण काही प्रॉब्लम आला तर करायचे काय? हा विचार त्याच्या मनात डोकावला आणि दिनु परत शांत बसला ........!!!

Subscribe to:
Posts (Atom)