Monday, October 19, 2009

गोष्ट एक मुलाची दिनुची.............Part-15

.................कसे आपले शौक पूर्ण करावे ह्याची त्याला आता चिंता लागुन राहिली होती........ आणि एक दिवस जे न घडायचे होते ते घडले.
                                 आता परत नविन काय बुवा................!!! दिनु ला आपल्या सवयी भागवण्या साठी  पैश्यांची गरज होती ना !!! असाच बसलेला असताना त्याचे लक्ष्य घरातल्या फ्रीज वर गेले .......... तीथे आईने पन्नास रुपयांची नोट ठेवली होती ........... आणि दिनु चे लक्ष्य आता त्या नोट वर होते. आणि त्याने कोणाच्याही नकळत ती गप्प चूप उचलली. हो ...........दिनु ने वाईट कृत्य केले होते आणि ते ही आयुष्यात पहिल्यांदा ............. खूप अश्या गोष्टी असतात की ज्या आयुष्यात पहिल्यांदाच घडतात, आणि नंतर बऱ्याचदा......!!! असेच काही तरी दिनु बरोबर घडत होते........ तो जणू भर्कटत चालला होता .... कुठे अणि कसा हे त्यालाही कळत नसावे......... आता ह्याला नादानी समजावी का मूर्ख पणा ह्या सर्व गोष्टींच्या पलिकडे जात होता आपला दिनु............!!!
                        नंतर त्याला ह्या गोष्टीचा पश्चाताप झाला आणि दिनु ने ठरवले की परत असे कृत्य कधीच करायचे नाही. दिनु निराश होता ते ठीक होते, पण आता त्या निराशेला एक वेगळेच वळ प्राप्त झाले होते........!!! ह्या साठी तो स्वतः कारणीभूत होता ...... इतर कोणीही नाही, आणि असू पण शकत नाही आणि नव्हतेच .........!!! 
                आता दिनु ची अभ्यासात पण अधोगति होत होती. त्याला वेळ आणि पैसे मिळाले की तो सिगरेट ओढत असे. त्याचे अभ्यासात लक्ष्य लागत नव्हते ........दिनु परीक्षेत नापास होऊ लागला, घरच्यांच्या आणि शिक्षकांच्या रोषाला तो सामोरा जात होता .......... मान खाली घालून ........ तरी पण तो सुधरला नव्हता ......... !!!
                    त्याच्या पण मनाला काही गोष्टी टोचत होत्या .... खुणावत होत्या त्याला की................

Friday, October 2, 2009

गोष्ट एक मुलाची दिनुची.............Part-14

......................दिनु आता घराकडे निघाला होता आणि नजरेत एक विलक्षण भाव दीसत होता त्याच्या........ तो आता घरी आला होता ............. 
                        जरा थकलेला होता दीसत होता तो .... आईने त्याच्या विचारले..'' काय झाले रे एव्हढा निराश का दिसतोस??'' त्याने उत्तर टाळले आणि गप्प हात पाय धुवून बसला ...... तेव्हढ्यात त्याच्या आईला काही तरी वास आला ........'' काय रे कसला वास येतोय तुझ्या अंगाला?'' .... '' अं काय काही नाही ग ...!!'' आणि दिनु ला आठवले अरेच्या आपल्या तोंडाला तर सिगरेट चा वास येत असणार. तो पटकन उठला आणि मोरी मध्ये पळाला आणि तोंड धुण्याचे नाटक करीत कोलगेट ने लगेच दात घासले सप्प सप्प करत आणि चूळ भरली ......... '' ह्म्म्म आता नाही ना येत ग वास..??'' दिनु आईला म्हणाला .......... '' नाही का रे काय खाल्लेस??'' .......... '' काही नाही ग तीथे बाहेर खूप धूर झाला होता ना मघाशी कदाचित त्याचा वास राहिला असेल अंगाला ....!! दिनु आईशी खोटे बोलला होता आता ही पण एक नविन सुरुवात म्हणावी का?? ......... तसेच म्हणावे लागेल.
                        आता दिनु सिगरेट रोज पीत होता आणि सारखा.......... शाळेत जाताना येताना आणि एव्हढेच नव्हे तर मधल्या सुट्टीत पण.......... गप्प चूप यार्ड मध्ये जाउन तो सिगरेट पीऊ लागला होता. हळू हळू त्याने एक सिगरेट पीत असलेल्या मुलांशी मैत्री केली आणि बिनधास्त पणे सिगरेट पीऊ लागला................. काय मज्जा वाटायची त्याला काय माहीत??......... पण तो रश्मी ला नाही विसरु शकला होता.......... रोज तीला चोरून बघायचा .... पण बोलायचा प्रयत्न मात्र कधीच केला नाही त्याने तीच्याशी .......... कारण तीचे शब्द आठवायचे त्याला.....'' मला नाही माहीत .. मी नाही सांगू शकत काहीच .. आताही नाही आणि कधीही नाही.....प्लीज़ मला त्रास नको देउस.........!!'' आणि तो गप्प बसायचा .... खरे प्रेम करायचा तो तीच्या वर आणि आताही करतो ........ जर का हे रश्मी पण वाचत असेल तर कदाचित तीला तीची चूक कळून येईल...... येईल का?? काय माहीत काय सांगावे कदाचित तीची चूक नसावी .......... आणि बहुधा नव्हतीच ... ते दोघेही तसे बघायला गेलो तर लहानच नाही का?? ............. असो पण आपल्या दिनु बाळाला हे कोण सांगणार ??
                                           त्याला आता सिगरेटची सवय झाली होती..... त्या शिवाय त्याला करमायचे नाही.......... कधी कधी पैसे पण कमी पडत त्याला ... मग त्याचे दुसरे मित्र होते ना सिगरेट पीणारे... त्यांच्या बरोबर अर्धी अर्धी करून पीत असे मग......... !!!! दिनुचा अभ्यास ही आता खालावला होता. आता तो पूर्वी सारखा हुशार किंवा सदगुणी दिनु राहिला नव्हता..... रोज त्याला आई आणि बाबा ओरडत असे आणि शाळेत शिक्षक लोक सुद्धा त्याच्या अभ्यासा बद्दल नाखुश होते .......... असणारच ना!!
    आता तर आई त्याला वर खर्च पण देत नसे ........... आता आली का पंचाईत ... सिगरेट कशी प्यावी ..... आणि मित्रच ते किती दिवस त्याला फूकट सिगरेट पाजणार...... मग काय करावे.... कसे आपले शौक पूर्ण करावे ह्याची त्याला आता चिंता लागुन राहिली होती........ आणि एक दिवस जे न घडायचे होते ते घडले ..............

Thursday, October 1, 2009

गोष्ट एक मुलाची दिनुची.............Part-13

....... मध्येच उठला आणि त्याने काही तरी विचार केला मनामध्ये आणि त्या यार्ड च्या बाहेर पडला दुकानावर जाउन त्याचे पाय थांबले होते, त्याची नज़र काहीतरी शोधत होती.... त्याचे होठ काही तरी बोलायला थरथरत होते........ तो बोलला................
          '' काका... काका .... एक सिगरेट दया.........'' दिनु दुकानदाराला बोलत होता ..... हो आपला दिनु बाळ आता सिगरेट पिणार होता  ...... का? कारण तो उदास होता म्हणुन.....??   का तो बेचैन होता म्हणुन...??? 
             त्याने त्या दिवशी मित्रांचे बोलणे ऐकले होते की सिगरेट पिल्यावर टेंशन कमी होते..... अच्छा तर आपल्या दिनु बाळाला टेंशन आले होते तर, आणि ते कमी करण्यासाठी आपला दिनु हा आता सिगरेट पिणार होता .......... काय म्हणावे आता ह्याला .......... दुकानदाराने त्याला खालून वर व्यवस्थित बघितले.....'' कुठली देऊ ....?? आणि ज़रा हेकट आवाजात बोलला त्याच्या आवाजा मध्ये तिरस्कार जाणवत होता ......... '' ती दया ती आहे ना क्लासिक मार्लबोरो आहे ना ती वाली .........!!''  दिनु ने त्याच्या मित्रांना ही सिगरेट पिताना बघितली होती. म्हणुन त्याला ही लगेच नाव लक्ष्यात आले ......... दिनु आता सिगरेट घेउन यार्डात परत आला होता .. त्याने इकडे तिकडे पाहिले तर थोडीशी गर्दी होतीच ... पण ओळखीचे कोणी दीसत नव्हते ... तरी दिनु ने उगाचेच रिस्क नाही घेतली आणि एका भिंतीच्या मागे आडोश्याला जाउन बसला ... थोडासा अंधार होता तीथे आणि दिनुचा चेहरा ही त्या अंधारात कोणाला नीट दिसला नसता........... आता सिगरेट कशी पेटवायची ??? हा एक मोठा प्रश्न होता त्याच्या समोर ......... आणि मध्येच त्याला ''अंधा कानून'' ह्या चित्रपटातला रजनीकांत आठवला, तो कसा सिगरेट पेटवून पीतो ते आठवले आणि प्रयत्न केला.......... पहिले दोन प्रयत्न अयशस्वी ठरले  आणि तीसरा प्रयत्न थोडा लागू पडला आणि एकदाची सिगरेट पेटली..... पहिला झुरका मारून बघितला त्याने आणि बाप रे खोकु लागला दिनु ........... नाका तोंडातून धुर बाहेर पडला आणि डोळ्यातुन पाणी पण आले पहिलाच प्रयत्न होता ना त्याचा ....... त्याने सावरले स्वतः ला आणि दूसरा झूरका ज़रा नीट मारला एकदम हळूच आणि आता त्याला ठसका लागला नव्हता ........... असे करत करत त्याने सर्व सिगरेट संपवली आणि दिनु ला जणू सिगरेट पीउन मज्जा आली असे भाव उमटले त्याच्या चेहऱ्यावर  ..!!!
                       दिनु आता घराकडे निघाला होता आणि चेहऱ्यावर एक विलक्षण भाव दीसत होता त्याच्या........ तो आता घरी आला होता .............

                 

Wednesday, September 30, 2009

गोष्ट एक मुलाची दिनुची.............Part- 12

..................रस्त्यावर दिव्याचे खांब असतात ना त्याचा अंधुक प्रकाश पडत होता तीच्या वर आणि किती सुंदर दीसत होती ती त्या प्रकाशात .... जशी चांदनी चमकावी एखादी .......
                         ''अरे बोल ना काही तरी ...........!!!'' .....रश्मी दिनु ला उद्देशून बोलली ... '' रश्मी........रश्मी... रश्मी आय लव यू .......... माझे तुझ्या वर खूप प्रेम आहे....!!'' .......... अखेर दिनु भाऊ आय लव यू बोलले एकदाचे.... आता पुढे काय.........??? रश्मी च्या नजरेत तो उत्तर शोधत होता ... '' बोल ना रश्मी मी तुला आवडतो का??'' ....... दिनु परत बोलला तीला ...'' आता नसेल सांगायचे तर नंतर सांग... चालेल मला पण आता काही तरी बोल... मी आवडतो का तुला???''.....  दिनु जीवाच्या आकांताने भाउक होउन बोलत होता .... तेव्हा रश्मी हळूच दबक्या आवाजात बोलली .. '' मला माहीत नाही ''...................'' माहीत नाही .........??? .. म्हणजे नेमके काय ... तुला वेळ हवा आहे का??'' .. दिनु बोलला हताश होउन थोडासा.....'' मला नाही माहीत .. मी नाही सांगू शकत काहीच .. आताही नाही आणि कधीही नाही.....प्लीज़ मला त्रास नको देउस.........!!''..... अरे बापरे ........ रश्मीच्या तोंडून हे शब्द ऐकून दिनुचा तोल जायचाच बाकी होता .......... पण सुनील ने सावरले त्याला... खूप हताश झाला होता तो.... होणारच ना !!! काय काय विचार केला होता त्याने ... त्याच्या सर्व स्वप्नांवर पाणी पडले होते.....रश्मी निघून जात होती तीथुन ... आणि आपला दिनु हताश खिन्न आणि उदास मुद्रेने तीची पाठमोरी आकृति त्याच्या नजरेतून दूर जाताना पाहात होता ........ अतीव यातना होत होत्या त्याच्या मनात .......... सुनील ने त्याला धीर दीला आणि ते परत घराकडे जाऊ लागले ............... सगळे संपले होते.......... दिनु ची आपल्या पहिल्या प्रेमात निराशे सकट हार झाली होती ....... दिनु चे पहिले वहीले प्रेम अधूरे राहिले होते..... '' सुनील तू घरी जा, मी आलोच थोड्या वेळाने ........'' दिनु सुनील ला उद्देशून बोलला .... आणि सुनील ही गप्पचुप त्याला, सोडून गेला त्याला माहीत होते की, आता बोलून काय फायदा नाही दिनु ला समजावने कठिन आहे खूप ......
                                        दिनु निघाला तिथून सरळ बांद्रा टर्मीनस यार्ड मध्ये गेला संध्याकाळची वेळ होती.......तशी यार्ड मध्ये खूप गर्दी असायची ह्या वेळी आजही होतीच ..............आणि दिनु शांत बसला होता खूप ....... मध्येच उठला आणि त्याने काही तरी विचार केला मनामध्ये आणि त्या यार्ड च्या बाहेर पडला दुकानावर जाउन त्याचे पाय थांबले होते, त्याची नज़र काहीतरी शोधत होती.... त्याचे होठ काही तरी बोलायला थरथरत होते........ तो बोलला................

गोष्ट एक मुलाची दिनुची.............Part- 11

...........दिनुच्या पावलांची हालचाल वाढली ......... त्या गल्लिचे टोक जवळ आले आणि दिनु तीला हाक मारायला पुढे सरसावला ... रश्मी ... रश्मी ...............!!!
                                              ती थांबली तीने वळून मागे बघितले ............तसा दिनु पुढे सरसावला आणि त्याने रश्मीच्या जवळ जाउन एक मोठासा सुस्कारा टाकला ......... दमला नव्हता तो.... पण त्याला ज़रा दडपण पण आले होते ना....येणारच आयुष्यातला पहिला वहिला प्रेम प्रस्ताव [प्रपोज] मांडणार होता तो .................. रश्मी पण थोडीशी घाबरली होती. दिनु काही बोलणार इतक्यात तीची मैत्रिण मध्येच बडबडली ...'' काय आहे .. का थाम्बव्लेस आम्हाला??'' थोडासा त्रासिक आव आणून म्हणाली होती ती ........... दिनु अगोदर ज़रा दचकला पण तीच्या बोलण्याचा त्याला खूप राग आला होता ... पण काही बोलला नाही तीला ............ बोलू पण शकत नव्हता काहीही ... त्याने फकत एकदा रागाने तीच्या कड़े बघितले आणि परत रश्मी कड़े आपली नज़र वळवली ....... परत ती मैत्रिण मध्ये टपकली...'' का त्रास देतोस आम्हाला, आम्हाला क्लासला जायचे आहे उशीर होईल .... चल ग रश्मी आपण जाउया..!!!''
           दिनु च्या तळपायाची आग आता मस्तकात गेली ..... त्याचा चेहरा बघून तरी तसेच वाटत होते ...... इतका वेळ शांत बसलेली रश्मी पण आता म्हणाली .....'' तुझे नाव दिनेश ना?''...............दिनेश चा राग कुठल्या पळाला .. कारण रश्मी त्याच्याशी पहिल्यांदाच बोलली होती किती खुश झाला होता तो ....... आता त्याचा चेहरा कसा प्रफुल्लित झाला होता ......... लब्बाड कुठला .........एव्हढ्यात रश्मी परत बोलली ..... '' तुला काही काम आहे का? आम्हाला क्लास ला जायचे आहे ....... आम्ही जाऊ का?''.......... वाह काय गोड शब्द कानावर पडले तीचे ...असे वाटले की काहीच बोलू नए तीला असेच ऐकत बसावे ... मी गप्प तीला न्याहाळत बसावे आणि तीने हसावे आणि बोलत रहावे ....'' अरे बोल ना काहीतरी असा गप्प का?'' रश्मी आता वैतागली होती ........इतका वेळ शांत उभा राहिलेला सुनील आता जवळ आला आणि त्याने दिनुला डोक्यावर टपली मारली .. '' टप्प '' असा आवाज आला आणि दिनु भानावर आला .. '' हा काय झाले ?'' ... दिनु सुनील ला उद्देशून म्हणाला ... '' अरे काय झाले काय ?? ......... बोल काहीतरी ...!!'' सुनील म्हणाला दिनुला.  दिनु बोलला ... '' अं... आ .. आ ... हो हो ... बोलतो ना..!!''............ आणि त्याने रश्मी कड़े बघितले.....ती पण त्याच्या कडेच बघत होती ........ निर्विकार चेहरा होता तीचा .. किती सुंदर वाटत होता ....... त्या अंधार्या गल्लीत पण ... किती छान दीसत होती ती ......... रस्त्यावर दिव्याचे खांब असतात ना त्याचा अंधुक प्रकाश पडत होता तीच्या वर आणि किती सुंदर दीसत होती ती त्या प्रकाशात .... जशी चांदनी चमकावी एखादी ....

Tuesday, September 29, 2009

गोष्ट एक मुलाची दिनुची.............Part- 10

.........नाही नाही दिनु घाबरला नव्हता पण काही प्रॉब्लम आला तर करायचे काय? हा विचार त्याच्या मनात डोकावला आणि दिनु परत शांत बसला ........!!!
                      दिनु शांत बसला ........... पण .... पण फकत दोनच दिवस .....!!! ह्म्म्म तसा त्याने सुनील ला बरोबर घेतले आणि निघाला, रश्मीला आपल्या प्रेमा बद्दल विचारायला ............. तो चालत होता आता जास्त काही दूर नव्हते पण ते अंतर ही त्याला खूप लांब वाटत होते .......... सुनील हा त्याचा जवळचा मित्र होता त्याला मूली पटवाचा चांगला अनुभव होता तसे त्याने दिनुला पण थोडीशी माहिती दिली होती ... पण दिनुच्या ती माहिती डोक्यावरुण गेली होती ......तो वेगळाच विचार करत होता ... त्याच्या छातीत धक् धक् होत होते ........ हृदयाची स्पंदने जणू घड्याळाच्या ठोक्या प्रमाणे त्याला भासत होती ........त्याच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. त्याच्या समोर अचानक ते मनोज चे प्रेम प्रकरण आठवले.........तसे तर काही होणार नाही ना ???? छे छे .... म्हणत त्याने स्वतःला सावरायचा प्रयत्न केला....छे छे मी त्या मनोज सारखा नाही मी लपून छपून सर्व करायला मी प्रेम करतो तीच्यावर .... पण .. पण ती करत असेल का??.......... ती जर नाही म्हणाली तर.....!!! तीने तीच्या घरी वगैरे सांगितले तर ..... त्या मुलीच्या आईने मनोज च्या श्रीमुखात भडकावलेले दृश्य त्याला आठवले .........क्षणात दिनुसमोर असे किती तरी विचार येउन गेले, तरी तो चालत होता ...........आता काहीही होऊ दे मागे नाही हटायचे, जी होईल त्याला सामोरे जायचे .. आपण काही भ्याड नाही आपण काही चुकीचे पण करत नाही .... ना !! मग का घाबरायचे असे विचार करता करता दिनु आता रश्मी राहते तीथपर्यंत येउन पोहोचला होता ... ज़रा आडोसा घेउन तो उभा राहिला होता .......... रश्मी आणि तीची मैत्रिण क्लास साठी निघाल्या होत्या.
                                  दिनु आणि सुनील त्यांच्या मागुन निघाले ...... रश्मीला काहीतरी वाटले आणि तीने हळूच मागे वळून बघितले आणि त्याला मागाहून चालत येणारा दिनु दिसला ........... दिनु जागीच थबकला ..आता..... आता काय तीला माहीत पडले होते की मी आहे म्हणुन............ मग .... त्याने सुनील कड़े बघितले त्याने म्हणजे सुनील ने त्याला पुढे व्ह्यायला खुणावले आणि दिनेश जरासा दचकून पण सावध होउन पुढे चालत राहिला ........... रश्मी ने त्याला बघून पण पुढे तशीच चालत राहिली काही बोलली नाही........... तीने तिच्या मैत्रिणीला पण ते सांगितले आणि तीने पण दिनुला मागून येताना बघितले.......... तरीही दिनु चालत होता आणि त्याच्या मागून सुनील ही येत होता .... त्यांना माहीत होते की पुढच्या गल्लीत अंधार असतो आणि तिकडे कोणाचा त्रास होणार नाही ........... दिनुच्या पावलांची हालचाल वाढली ......... त्या गल्लिचे टोक जवळ आले आणि दिनु तीला हाक मारायला पुढे सरसावला ... रश्मी ... रश्मी ...............

गोष्ट एक मुलाची दिनुची.............Part-9

हा हा म्हणता शाळा सुरु झाली होती. आणि नववीतला दिनु अभ्यासाला लागला पण लक्ष्य लागत नव्हते कश्याताच त्याचे......... कसे लागणार म्हणा....?
                   त्यात भर म्हणजे आता त्याला त्याचे मित्र पण पीडू लागले होते तीच्या नावावरून, त्याला ते आवडायचे नाही शेवटी दिनु चे पहिले प्रेम होते ना ते .............!!! त्याची आता मित्रांबरोबर हुज्जत होऊ लागली त्या विषयावरुण .... दत्तात्रेय नावाचा त्याच्या वर्गात एक मुलगा होता तो पण रश्मी वर लाइन मारायचा .... दिनुला ते आवडायचे नाही ...त्याच्या बरोबर सारखे भांडन व्ह्यायचे दिनुचे आणि त्याचे ...........दिनु आता खूप रागीट स्वभावाचा मुलगा बनला होता त्याला लगेच राग येत असे आणि त्याचे पर्यावसन मारा मारी आणि हमरी तुमरी वर येत असे ............ हा फार मोठा बदल दिनु मध्ये झाला होता .. तो काहीसा आक्रामक वृत्तीचा झाला होता. घरी पण तो सरळ बोलत नसे .........आई वडिल पण आश्चर्य चकित झाले होते त्याच्यातील ह्या बदला मूळे ... पण त्यांनी कारण जाणून घ्यायचा प्रयत्न कधी केलाच नाही आणि केला जरी असता तरी दिनु थोडेच त्यांना खरे सांगणार होता.
                        दिनुचे काही मित्र व्यसन करीत असत ... दिनु त्यांचा राग करायचा आधी ...पण आता तो त्यांच्या बरोबर हिंडू फिरू लागला होता. कळत नकळत त्याला पण वाटायचे की एक सिगरेट ओढून बघावी आपण पण .......... पण नाही ओढली त्याने त्यावेळी. त्याची हिम्मत नसेल झाली......... नाही झाली तेच बरे होते.......... त्याच्या साठी!!!
                                                              खार रोड मध्ये जीथे दिनु रहायचा तीथे त्याच्या गल्ली मध्ये एक सुनील नावाचा त्याचा मित्र होता त्याच्या मदतीने दिनु ने रश्मी ला एकांतात गाठून तीच्या समोर प्रेमाचा प्रस्ताव मांडायचा असे ठरवले. पण अडचन पण होती त्या प्लान मध्ये की, रश्मी च्या मैत्रिणी तीच्या बरोबर नेहमी असायच्या.........!!! आता काय करावे...??? लोचा होणार जर तीला म्हणजे रश्मी ला आपण प्रेमा बद्दल विचारलेले आवडले नाही तर..........??? तीच्या मैत्रिणीने वगैरे आरडा ओरड वगैरे केली तर.........???  नाही नाही दिनु घाबरला नव्हता पण काही प्रॉब्लम आला तर करायचे काय? हा विचार त्याच्या मनात डोकावला आणि दिनु परत शांत बसला ........!!!
                                     

Monday, September 28, 2009

गोष्ट एक मुलाची दिनुची.............Part-8

...............सगळे मुंबई ला आले आणि परत दिनक्रम सुरळीत पणे सुरु झाला होता. पण दिनु आपला बेचैन होता.
                          त्याला फकत एकच ध्यास होता तो रश्मीचा...!!! दिनुला वार्षिक परीक्षेत जेम तेम गुण पडले होते, पण काटावर का होईना दिनु पास झाला होता, घरचे लोक ओरडले त्याला पण ओरडून आता काय होणार आहे...??? त्याला पण खूप वाईट वाटले होते. आपला दिनु बाळ आता हुशार राहिला नव्हता का?............ कदाचित नाही आणि कदाचित हो पण !!! मला तर वाटते आपण कोणाची ही गुणवत्ता त्याच्या अभ्यासातील गुणां पेक्षा त्याच्या स्वभावा वरुण आणि आचरणा वरुण केली तर बरे होईल........ पण तसे होत नाही ना ... बरे जाऊ दे असो !!!
                                      त्याने आता ठरवले होते की सर्व काही विसरून जायचे आणि अभ्यासाला लागायचे .... हो दिनु ने हा विचार केला होता .... तुम्ही म्हणाल असे कसे करू शकत होता तो..... पण त्याच्या कड़े कदाचित दूसरा पर्याय नसावा .....त्याने त्याच्या छोट्याशा हृदया वर मोठठा सा दगड ठेवला होता ............. त्याला सहन झाले असते का ते दडपण ???..........कदाचित नाही, तो ह्या दबावाखाली मुक्त पणे नाही जगु शकत होता ......... मग पुढे काय??
                       हा हा म्हणता शाळा सुरु झाली होती. आणि नववीतला दिनु अभ्यासाला लागला पण लक्ष्य लागत नव्हते कश्याताच त्याचे......... कसे लागणार म्हणा....??

गोष्ट एक मुलाची दिनुची.............Part-7

आपला दिनु तसा फार शांत होता, पण जर भडकला ना तर त्याला पण समजायचे नाही की तो काय बोलतोय आणि काय करतोय याची तो कल्पना पण नाय करू शकत होता आणि आपण ही ती ना केलेलीच बरी ......... पुढे कळेलच तुम्हाला ते.................!!!
                        आता शाळा परत सुरु झाली होती. परत दिनु आता अभ्यासाला लागला होता आणि त्याला आपल्या अभ्यासाचे नुकसान करून घ्यायचे नव्हते .... पण रश्मी बद्दल त्याची ओढ़ काही कमी झाली नव्हती, ती ओढ़ तर दिवसें दिवस वाढतच होती.
                      त्याच्या वर्गात त्याचा एक मित्र होता ... मित्रच म्हणूया सुरुवातीला त्याला त्याचे नाव होते मनोज ... आडनाव सांगणार नाही ... सांगू शकतो पण जाऊ दे ......... त्या भाई ने पराक्रम केला मोठा दिनु च्या बाबतीत तो असा की, त्या मनोज ला पण एक मुलगी आवडायची तीचे नाव होते ............. नको नाव नको सांगायला माफ़ करा मला नाही सांगू शकत ते ... तर मग पुढे त्या मनोज साहेबांनी आपल्या आवडत्या मूली साठी एक प्रेम पत्र लिहिले आणि सर्वात मोठे शहान पण हे केले की त्याने दिनु ला न सांगता मधल्या सुट्टी मध्ये त्याच्या दप्तरातील त्याच्या कवितेच्या वही मधून त्याची कविता ढापली आणि त्या प्रेम पत्रात लिहिली ... वाह मनोज वाह ............. असा मित्र असण्यापेक्षा दुश्मन परवडले ना .............!!! त्या मुलीने ते पत्र तीच्या आईला दाखवले. त्याच्या आईने शाळे मध्ये येउन त्या मनोज च्या एक मस्त पैकी कानाच्या खाली भडकावली आणि मुख्याध्यापक गुरुजीं कड़े घेउन गेली. सर्व वर्ग शांत होता कोणाला काही कळलेच नाही काय घडले ते .....थोड्या वेळाने शिपाई वर्गात येउन दिनु कोण आहे म्हणुन विचारले... आपला दिनु बाळ तर थंडच पडले ...........दिनु म्हणाला ''मी आहे काय झाले?''.... शिपाई म्हणाला '' तुला मुख्याध्यापक सरांनी बोलावले आहे ... आइंग................. आता मी काय केले असा प्रश्न त्याला पडला त्याला वाटले रश्मी बद्दल तर नाही ना बोलावले आपल्याला .... पण कसे शक्य आहे मी तीला कधी त्रास नव्हता दीला, काही बोललो पण नाही, मग कश्याला बोलावले असणार मला ... विचारांचे थैमान साचले होते त्याच्या मनात ..... दिनु सरांसमोर उभा राहिला मान खालीच होती त्याची ... सरांनी दिनुला विचारले, ''ही कविता तुझी आहे का?''............. आईला दिनु च्या खालची ज़मीन सरकली हे कसे झाले नंतर त्याला समजले की हा झोल मनोज चा आहे म्हणुन.
दिनु ने मान हलवून होकार दीला आणि सरांना खरे खरे सांगितले की कविता माझी आहे पण हा प्रकार काय आहे ते मला नाही माहीत. तरी सरांना दिनु चे बोलणे पटले नाही कारण मनोज ने खोते सांगितले होते की ती कविता त्याला दिनु ने दिली होती ... वाह मनोज वाह ........ काय दोस्ती आहे ही!!!  त्या मनोज मूळे बिच्चारा दिनु पण काहीही न करता उगाचच नको त्या प्रकरणात अडकला होता ... सरांनी दिनु ला पालकांना घेउन यायला सांगितले तसे दिनु आईला घेउन गेला होता .... त्याच्या आईला दिनुची कविता लिहिण्याची सवय माहीत होती पण एव्हढी गंभीर गोष्ट घडेल असे तीला कधी वाटले नव्हते. दिनुला खूप ओरडा पडला घरच्यांचा आणि अभ्यासात पूर्ण लक्ष्य घालण्याची ताकीद मिळाली. आईने त्याची कवितांची वही पण फाडून टाकली सरां समोर त्याला खूप वाईट वाटले राग पण आला पण करणार काय?........... काहीच नाही मग गप्प बसा आता काहीच नाही करायचे ... त्यामूळे त्याने रश्मी चा विषय पण बाजुला ठेवायचे ठरवले ............. काय करणार नाहीतर दूसरी कसली पंचाईत व्हायची आणि भलताच लफडा व्हायचा ना .........
                    कसे बसे करत वार्षिक परीक्षा उलटली आणि सुट्ट्या सुरु झाल्या मे महिन्याच्या पण आपला दिनु बाळ जैसे थे ....!!!! मे महिन्या मध्ये आपला दिनु बाळ गावी गेला खूप आंबे खाल्ले आणि बरोबरच्या चुलत भावांबरोबर खेळन्यात रममाण झाला, त्याची आजी आणि चुलता हे गावी रहायचे. पण त्याच्या वडिलांच्या आग्रहा वरुण ते दोघे त्यांच्या बरोबर मुंबई ला यायला तयार झाले. दिनुला एक काका आणि ४ आत्या होत्या. एकून ६ भावंडे होती त्याचे पप्पा पकडून, तसे त्यांचे कुटुंब मोठेच होते.
                                  आता सुट्टी संपत आली होती ना मग दिनुला परत शाळेचे वेध लागले आणि त्याच्या प्रियतमेचे रश्मीचे.... आता आपला दिनु बाळ नववी ला जाणार होता ना..................... सगळे मुंबई ला आले आणि परत दिनक्रम सुरळीत पणे सुरु झाला होता. पण दिनु आपला बेचैन होता .

Sunday, September 27, 2009

गोष्ट एक मुलाची दिनुची.............Part-6

आता आली सुट्टी दिवाळीची आता त्याला तग मग लागुन राहिली होती की रश्मी ला कसे भेटायचे कसे आणि मुख्य म्हणजे बघायचे कसे ..............??
                                                       त्याची तग मग बघून त्याचा एक मित्र पुढे आला त्याला मदत करण्यासाठी त्याचे नाव होते राजेश कड. पण तो पण त्याला जास्त मदत करू शकत नव्हता, कारण ती त्याच्या घरापासून जवळच रहायची ती........... मग काय दिनु खुश होता परत की कोणी तरी मदतीला आहे म्हणुन. दिनु रोज राजेश च्या घरी जाऊ लागला आणि त्याच्या बरोबरीने रश्मी ला चोरून पाहू लागला. हे आता रोजचेच झाले होते. रश्मीला पण आता हळू हळू आता हे सर्व कळू लागले होते, पण ती काहीच बोलायची नाही कशी बोलणार ती पण लहान होती तशी.... सातविला तर होती....!!!
                                                    आता आपला दिनु बाळ कविता करू लागला होता......... काय आश्चर्याचा धक्का बसला का?.......... हो हे खरे आहे दिनु आठवी पासूनच कविता करू लागला होता... दिनुची पहिली कविता त्याने अतिशय मन लावून लिहिली होती... अतिशय प्रेमाने.......... वाह काय प्रेम होते ते आणि काय दिवस होते ते........
                     
                      हे डोळे तुझे शराबी
                      हे ओठ तुझे गुलाबी!
                      हे गोरे गोरे अंग
                      जसा गुलाबाचा गंध!!!

                      हे हात जणू कमलपात्र
                      तुज पाहता दीपती नेत्र!
                      तुझी शुभ्र कांति बघुनी
                      घायाळ होतो मी मनोमनी !!!

                      सहवास कसा होईल प्राप्त
                      कधी होईन मी तृप्त!
                      लागला मज तुझाच ध्यास
                      ना कळे कसला हव्यास !!!

                      भाव मनातले उलगडू कसे?
                      तुज सवे मी सांगू कसे?
                      माझे प्रेम तीला कळेल का?
                      प्रीत मला मिळेल का?

कशी वाटली ही दिनुची पहिली वाहिली कविता ...........??? मला माहीत आहे की थोडी वाकडी तिकडी आहे पण आहे तशी मांडली आहे ........... त्यानंतर त्याने खूप कविता लिहिल्या ..... पण एक चूक केलि .......... त्याने कधी त्याच्या कविता संग्रहीत करून ठेवल्या नाहित ...........ही त्याची चूक मोठी अशी नव्हती पण चूक ही चूक असते ना.......!!!

त्याच्या कविता त्याच्या मित्रांना पण तो वाचून दाखवू लागला. त्यांना पण आवडल्या काही आणि काहींनी त्यांच्या खोडकर सवयी मूळे त्याची टिंगल मस्करी केली ........... पण हार मानेल तो दिनु कसला .....!!!!
                                आपला दिनु तसा फार शांत होता, पण जर भडकला ना तर त्याला पण समजायचे नाही की तो काय बोलतोय आणि काय करतोय याची तो कल्पना पण नाय करू शकत होता आणि आपण ही ती ना केलेलीच बरी ......... पुढे कळेलच तुम्हाला ते.................!!!

गोष्ट एक मुलाची दिनुची.............Part-5

तीचे नाव पण छान होते अगदी तिच्या सारखेच होते................ तीचे नाव ऐकले की अजूनही तीची छवी डोळ्या समोर येते ...... किती छान वाटतेय मलाही हे इथे लिहिताना मनातील सर्व च्या सर्व साज वाजू लागले आता ........... ते शाहरुख़ खान चे गाणे आठवले, '' तुम्हे जो मैंने देखा तुम्हे जो मैंने जाना जो होश था वोह तो गया ''..............
                                         तीचे नाव पण तीच्या रुपाला साजेसे असेच होते .... '' रश्मी '' . रश्मी होते ........ नाही नाही होते नाही आहे तीचे नाव ... किती छान ना ऐकायला ही बरे वाटते ................... तर असे सुरु झाले दिनु बाळाचे पहिले एकतर्फी प्रेम . दिनु तसा धाडसी नव्हताच पण काही लेचा पचा पण नव्हता हा तो ...... हा त्याचा पहिला अनुभव होता ना ..... त्याच्या मित्रांना त्याने झालेल्या प्रकारा बाबत सांगितले पण कोणीही त्याची मदत नाही केली, बिचारा दिनु ..........फार दुखी होता तो....... असणारच.........!!!
                                         रोज तीला बघायचा लपून छपून, त्या पेक्षा तो अजुन काय करू शकत होता ......... आणि कोणी मदत पण करणारा नव्हता त्याला बिच्चारा मनातल्या मनात झुरत होता ना तो. एक एक दिवस असाच जात होता आणि आपला दिनु बाळ दिवसें दिवस उदास होत होता ................ सहामाही परीक्षेत पण दिनु चांगल्या गुणांनी पास झाला होता आता आली सुट्टी दिवाळीची आता त्याला तग मग लागुन राहिली होती की रश्मी ला कसे भेटायचे कसे आणि मुख्य म्हणजे बघायचे कसे ..............??

गोष्ट एक मुलाची दिनुची.............Part-4

एक आठवडया ची मेहेनत आता दीसून येणार होती ..... त्याने परत धक् धक्त्या हृदयाने पेपर उघडला ........
                              आणि...................... जणू एक वादळ चक्रावून गेले त्याच्या डोक्यात त्याला इतका वेळ जे धक्के बसले ते हलके होते हा ज़रा मोठाच होता ना ............ दिनु ला गणिताच्या पेपर मध्ये ४० पैकी ३४ गुण मिळाले, हो हे खरे आहे दिनुला ३४ गुण बघून वेड लागणार होते ............. बस तेव्हढेच बाकी होते आणि इतक्यात त्याच्या खांद्यावर हात पडला ज़रा कनखर लागला, कोना तरी मोठ्या माणसाचा होता तो ............. त्याने मागे वळून बघितले तर त्याचे पिसाळ सर आणि दिलीप जाधव सर त्याच्या कड़े बघून हसत होते .... त्याला काही समजले नाही ते का हसत होते ...... सर पुढे येउन म्हणाले की, " वाह दिनु वाह चांगले गुण पडले तुला असाच अभ्यास कर .. शाब्बास !!! दिनु पास हो गया ................तुमच्या समोर लगेच अमिताभ ची जाहिरात आली ना डोळ्या समोर पप्पू पास हो गया ची ......... असेच काही तरी घडले होते तेव्हा .. आणि दिनुची गणती चांगल्या हुशार मुलांमध्ये होणार होती ........... होती काय सुरु झाली होतीच. घरी पण मज्जा होती त्याची आता पप्पा खुश आणि पण खुश म्हणजे आता बिनधास्त क्रिकेट खेळू शकतो पाहिजे तेव्हढा वेळ कार्टून बघू शकतो त्या वेळी नुकताच कार्टून नेटवर्क हा चॅनल आला होता .....................'टॉम एंड' जेरी त्याला खूप आवडायचे आणि 'डक टेल्स' सुद्धा. मज्जा होती आता एक बाळाची. सर्व वर्गात तो आता लाडाने मिरवीत असे आता मॉनिटर बनला होता ना आणि पहिल्यांदाच .... आणि असेच दिवस जात होते आणि दिनु दिवसा गणिक वाहत जात होता एका सैर वैर नदी सारखा....
                       आणि एक दिवस दिनु ने तीला बघितले ........ ती सातविला होती ती आणि दिनु आठविला. दोघांची नज़र भेट झाली आणि दिनुला ती पहिल्या क्षणात आवडली होती. ती फार सुंदर होती ... गोरी नीट नेटकी आणि व्यवस्थित बांधा .... तीच्या नजरेत एक चमक होती आणि तीच चमक दिनुच्या नजरेत जणू वीज बनून चमकली होती ........... तीचे नाव पण छान होते अगदी तिच्या सारखेच होते.................

Saturday, September 26, 2009

गोष्ट एक मुलाची दिनुची.............Part- III

कसा बसा परीक्षेचा दिवस उजाडला ...... दिनु तसा भीत भीत परीक्षेला गेला ....................
अभ्यास तसा जेम तेम केलेला .... जेव्हढे आठवले तेव्हढे लिहिले आणि परीक्षा संपवून घरी आला .... असे एक - दोन करत करत ... सात पेपर लिहून झाले परीक्षा संपल्या,
दिनु तसा थोडासा घाबरलेला होता.... मग आज त्याचा परीक्षेचा निकाल होता ना, पिसाळ सर सर्वांना बोलवून बोलवून हातात पेपर देत होते ... दिनुला पण बोलावले, दिनु भीत भीत सरांजवळ गेला आणि सरांनी काहीही ना बोलता दिनुच्या हातावर पेपर ठेवले, त्यांचा चेहरा निर्विकार होता ............... दिनुला काही सुचत नव्हते ... त्याने पेपर घेतले आणि आपल्या जागी येउन बसला सुरुवातीची १० मिनट त्याने पेपर बघितलाच नाही भीतीने .... पण बघावे तर लागणार होते ना ...
शेवटी हिम्मत करून त्याने पहिला पेपर बघितला मराठी चा होता तो .... पास झाला त्यात दिनु ........ ज़रा भीती कमी झाली ४० पैकी ३३ गुण पडले त्याला .... नंतर हिंदी चा पेपर होता ... या पेपर ची भीती नव्हती त्याला हिंदी विषय चांगला होता त्याचा ४० पैकी ३१ गुण पडले त्याला... वाह दिनु वाह दिनु ज़रा आता लाडात आला होता दोन्ही विषयात चांगले गुण पडले होते त्याला ना, आता तीसरा पेपर त्याने बघितला इंग्लिश चा होता तो ... परत आपला दिनु घाबरला ..... कारण त्य्ताला आठवले दिलीप जाधव सर खूप मारायचे.... अग आई हृदया मध्ये कळ भरून आली, परत भीत भीत त्याने पेपर बघितला ... आता त्याचे डोळे बटाटया एव्हढे झाले होते ... ४० पैकी २७ गुण ... दिनु भाऊ अगदी उडालाच बेंच वर ..... सवारी खूषित होती साहेबांची ...... पण अजुन पेपर बाकी होते बघायचे, त्याने ज़रा वर्गात नज़र फिरवली ... काही हसत होते आणि मागच्या बेंच वरचे ज़रा उदास होते .... असणारच ना ... त्यांचे राहू दे आपण दिनुचे बघू काय...............??

त्याने हळूच चौथा पेपर उघडला .... छातीत धक् धक् सुरु झाले होते त्याच्या पुढचा पेपर विज्ञान चा होता आणि आता तर दिनु भलताच हादरला होता .... कारण ही तसेच होते त्या मागचे कारण साहेब पास झाले विज्ञान मध्ये पण ४० पैकी ३१ मिळाले होते.......... आता इतिहास चा पेपर होता पुढचा त्यात पण पास २० पैकी १४ गुण आणि भूगोलात पण २० पैकी १५ गुण आणि एकून चाळी पैकी २९ गुण मिळाले साहेबांना आता शेवटचा पेपर होता गणिताचा............आता खरी मज्जा होती आणि कसोटी पण होतीच की............. एक आठवडया ची मेहेनत आता दीसून येणार होती ..... त्याने परत धक् धक्त्या हृदयाने पेपर उघडला ...   आणि......................

गोष्ट एक मुलाची दिनुची.............Part-II

नमस्कार..............

आता दिनु सातवी पास झाला .............. मे महिना कसा बसा संपला होता... सुट्टी संपली शाळा सुरु होण्याची वेळ जवळ आली..... नविन दप्तर, नविन कपड़े नविन पुस्तके ह्यांची खरीदारी सुरु होती .... तसा दिनु खुश होता कारण ........

आता तो स्वतः ला हुशार समजत होता, मोठा झाला होता न ...... म्हणजे साधारण १३ ते १४ वर्षांचा झाला असेल,
पण कळत न कळत एक गोष्ट घडत होती ..... ती नैसर्गिक सुद्धा म्हणु शकाल किंवा आजू बाजुच्या वातावरणाचा परिणाम सुद्धा म्हणु शकाल की, त्याचे विजातीय शारीरिक आकर्षण वाढू लागले होते ..... त्याची ऊंची चांगली असल्या कारणाने त्याला शाळे मधल्या गुरुजींनी श्री [स्व.] पिसाळ सरांनी मागच्या बाकावर बसवले होते ..... अगोदर त्याला राग आला पण काय करणार त्याला गप्प रहावे लागले होते... बोलू पण शकत नव्हता काही [त्याला मार खायचा नव्हता ना].............. मागच्या बाकावर त्याला काही नविन मित्र भेटले त्यांची नावे नाही सांगू शकत.......... वाचतील तर मारतील मला.......... हा हा हा हा ..... त्या मित्रांनी त्याला जणू गुप्त ज्ञान दीले त्याला जणू तेव्हा पासून त्याच्या स्वप्नात आणि प्रत्यक्षात एक सुप्त अशी भावना उमलू लागली होती ..... हा शारीरिक बदल दिनु साठी अगदी नविन होता आणि असणारच ...!!!!
त्याला आता विजातीय आकर्षण आणि मज्जा वाटत होती नेत्र सुख अनुभवत होता ........ त्याच्या बरोबरच्या वर्गातील मूलिंकडे तो घ्रुनास्पद नजरेने बघत होता, ही गोष्ट जरी चुकीची असली तरी त्या वेळी त्याला थोडीच काही कळत होते ..... ते आकर्षण आता व्यसनात बदलू लागले होते ............ अभ्यासात लक्ष्य लागत नव्हते आठवी मधला मुलगा आता स्वप्ने रंगवू लागला होता पण पण ......... त्या स्वप्नांना तो चेहरा देऊ शकत नव्हता , का बरे................?? कारण त्याला जोडीदार नव्हता म्हणुन झुरत असावा , आता ह्या वेळी आणि ह्या त्याला वयात जोडीदार कुठून आणावा............??
काय करावे सुचत नाही ...... आणि काही करू पण शकत नव्हता एव्हढा डेरिंग बाज आणि धाडसी अजुन नव्हता आपला दिनु बाळ............ !!! पहिली चाचणी जवळ आली होती अगदी आठ दीवसांवर येउन ठेपली होती..... अभ्यास तर काहीच झाला नव्हता कसा होणार लक्ष्य दूसरी कडेच होते ना, दिनु आता अभ्यासाला लागला होता एकदम फुल टू सीरियसली अभ्यासात घुसला होता नाहीतर मार खाल्ला असता आईचा आणि पप्पांचा तो वेगळाच आणि वर्गात इज्जत गेली असती ती वेगळीच ...............!!!
काहीही झाले तरी पास व्हायचेच ........... असा जणू पण त्याने केला होता ... कसा बसा परीक्षेचा दिवस उजाडला ...... दिनु तसा भीत भीत परीक्षेला गेला ...............................


to be cont..............

Tuesday, September 22, 2009

गोष्ट एक मुलाची दिनुची.............Part- I

नमस्कार,
तुम्ही सर्व माझ्या पहिल्या वहिल्या ब्लॉग वाचण्यास त्रास घेतलात त्या बद्दल मनापासून शतशः धन्यवाद।

ही कहानी आहे एक मुलाची दिनु ची ..............!!!

दिनु हा एक तसा मध्यम वर्गीय कुटुंबात वाढलेला, सरळ आणि सोप्प्या चाली रिति आणि वातावरण असलेले त्याचे घर होते, आई वडिल आणि एक बहिन बस एव्हढेच त्याचे कुटुंब होते, त्याची आजी आणि काका वगैरे पण होते ....... पण ते गावी असायचे... त्यांच्या बद्दल आपण नंतर बोलू , लहान पणी शाले मध्ये असताना तो खूप सभ्य होता ..................... कारण लहान होता ना !!!! तसा तो अभ्यासू होता पण खोडकर ही होता ............. जाम मस्ती करायचा एकुलता एक होता ना तो .............. म्हणुन लाडकाच होता घरा मध्ये सर्वांचा ......
पण त्याच्या आईचा दबाव होता त्याच्यावर .................. आणि वडिलांचा धाक सुद्धा होताच की .... !!!!
आता दिनु सातवी पास झाला .............. मे महिना कसा बसा संपला होता... सुट्टी संपली शाळा सुरु होण्याची वेळ जवळ आली..... नविन दप्तर, नविन कपड़े नविन पुस्तके ह्यांची खरीदारी सुरु होती .... तसा दिनु खुश होता कारण ........

To be continued............