.................कसे आपले शौक पूर्ण करावे ह्याची त्याला आता चिंता लागुन राहिली होती........ आणि एक दिवस जे न घडायचे होते ते घडले.
आता परत नविन काय बुवा................!!! दिनु ला आपल्या सवयी भागवण्या साठी पैश्यांची गरज होती ना !!! असाच बसलेला असताना त्याचे लक्ष्य घरातल्या फ्रीज वर गेले .......... तीथे आईने पन्नास रुपयांची नोट ठेवली होती ........... आणि दिनु चे लक्ष्य आता त्या नोट वर होते. आणि त्याने कोणाच्याही नकळत ती गप्प चूप उचलली. हो ...........दिनु ने वाईट कृत्य केले होते आणि ते ही आयुष्यात पहिल्यांदा ............. खूप अश्या गोष्टी असतात की ज्या आयुष्यात पहिल्यांदाच घडतात, आणि नंतर बऱ्याचदा......!!! असेच काही तरी दिनु बरोबर घडत होते........ तो जणू भर्कटत चालला होता .... कुठे अणि कसा हे त्यालाही कळत नसावे......... आता ह्याला नादानी समजावी का मूर्ख पणा ह्या सर्व गोष्टींच्या पलिकडे जात होता आपला दिनु............!!!
नंतर त्याला ह्या गोष्टीचा पश्चाताप झाला आणि दिनु ने ठरवले की परत असे कृत्य कधीच करायचे नाही. दिनु निराश होता ते ठीक होते, पण आता त्या निराशेला एक वेगळेच वळण प्राप्त झाले होते........!!! ह्या साठी तो स्वतः कारणीभूत होता ...... इतर कोणीही नाही, आणि असू पण शकत नाही आणि नव्हतेच .........!!!
आता दिनु ची अभ्यासात पण अधोगति होत होती. त्याला वेळ आणि पैसे मिळाले की तो सिगरेट ओढत असे. त्याचे अभ्यासात लक्ष्य लागत नव्हते ........दिनु परीक्षेत नापास होऊ लागला, घरच्यांच्या आणि शिक्षकांच्या रोषाला तो सामोरा जात होता .......... मान खाली घालून ........ तरी पण तो सुधरला नव्हता ......... !!!
त्याच्या पण मनाला काही गोष्टी टोचत होत्या .... खुणावत होत्या त्याला की................
Monday, October 19, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment