हा हा म्हणता शाळा सुरु झाली होती. आणि नववीतला दिनु अभ्यासाला लागला पण लक्ष्य लागत नव्हते कश्याताच त्याचे......... कसे लागणार म्हणा....?
त्यात भर म्हणजे आता त्याला त्याचे मित्र पण पीडू लागले होते तीच्या नावावरून, त्याला ते आवडायचे नाही शेवटी दिनु चे पहिले प्रेम होते ना ते .............!!! त्याची आता मित्रांबरोबर हुज्जत होऊ लागली त्या विषयावरुण .... दत्तात्रेय नावाचा त्याच्या वर्गात एक मुलगा होता तो पण रश्मी वर लाइन मारायचा .... दिनुला ते आवडायचे नाही ...त्याच्या बरोबर सारखे भांडन व्ह्यायचे दिनुचे आणि त्याचे ...........दिनु आता खूप रागीट स्वभावाचा मुलगा बनला होता त्याला लगेच राग येत असे आणि त्याचे पर्यावसन मारा मारी आणि हमरी तुमरी वर येत असे ............ हा फार मोठा बदल दिनु मध्ये झाला होता .. तो काहीसा आक्रामक वृत्तीचा झाला होता. घरी पण तो सरळ बोलत नसे .........आई वडिल पण आश्चर्य चकित झाले होते त्याच्यातील ह्या बदला मूळे ... पण त्यांनी कारण जाणून घ्यायचा प्रयत्न कधी केलाच नाही आणि केला जरी असता तरी दिनु थोडेच त्यांना खरे सांगणार होता.
दिनुचे काही मित्र व्यसन करीत असत ... दिनु त्यांचा राग करायचा आधी ...पण आता तो त्यांच्या बरोबर हिंडू फिरू लागला होता. कळत नकळत त्याला पण वाटायचे की एक सिगरेट ओढून बघावी आपण पण .......... पण नाही ओढली त्याने त्यावेळी. त्याची हिम्मत नसेल झाली......... नाही झाली तेच बरे होते.......... त्याच्या साठी!!!
खार रोड मध्ये जीथे दिनु रहायचा तीथे त्याच्या गल्ली मध्ये एक सुनील नावाचा त्याचा मित्र होता त्याच्या मदतीने दिनु ने रश्मी ला एकांतात गाठून तीच्या समोर प्रेमाचा प्रस्ताव मांडायचा असे ठरवले. पण अडचन पण होती त्या प्लान मध्ये की, रश्मी च्या मैत्रिणी तीच्या बरोबर नेहमी असायच्या.........!!! आता काय करावे...??? लोचा होणार जर तीला म्हणजे रश्मी ला आपण प्रेमा बद्दल विचारलेले आवडले नाही तर..........??? तीच्या मैत्रिणीने वगैरे आरडा ओरड वगैरे केली तर.........??? नाही नाही दिनु घाबरला नव्हता पण काही प्रॉब्लम आला तर करायचे काय? हा विचार त्याच्या मनात डोकावला आणि दिनु परत शांत बसला ........!!!
Tuesday, September 29, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)

3 comments:
dinu kharech shaant basu shakto ka?
HAhaha ... really ... real story aahe .... ani cant beleive ... marathi itake changale ... school madhe aasate .. tar marathit top kele aasates .. [:P]
dinu ajun suddha khoop raageet aahe mhatle ka?
Post a Comment