आपला दिनु तसा फार शांत होता, पण जर भडकला ना तर त्याला पण समजायचे नाही की तो काय बोलतोय आणि काय करतोय याची तो कल्पना पण नाय करू शकत होता आणि आपण ही ती ना केलेलीच बरी ......... पुढे कळेलच तुम्हाला ते.................!!!
आता शाळा परत सुरु झाली होती. परत दिनु आता अभ्यासाला लागला होता आणि त्याला आपल्या अभ्यासाचे नुकसान करून घ्यायचे नव्हते .... पण रश्मी बद्दल त्याची ओढ़ काही कमी झाली नव्हती, ती ओढ़ तर दिवसें दिवस वाढतच होती.
त्याच्या वर्गात त्याचा एक मित्र होता ... मित्रच म्हणूया सुरुवातीला त्याला त्याचे नाव होते मनोज ... आडनाव सांगणार नाही ... सांगू शकतो पण जाऊ दे ......... त्या भाई ने पराक्रम केला मोठा दिनु च्या बाबतीत तो असा की, त्या मनोज ला पण एक मुलगी आवडायची तीचे नाव होते ............. नको नाव नको सांगायला माफ़ करा मला नाही सांगू शकत ते ... तर मग पुढे त्या मनोज साहेबांनी आपल्या आवडत्या मूली साठी एक प्रेम पत्र लिहिले आणि सर्वात मोठे शहान पण हे केले की त्याने दिनु ला न सांगता मधल्या सुट्टी मध्ये त्याच्या दप्तरातील त्याच्या कवितेच्या वही मधून त्याची कविता ढापली आणि त्या प्रेम पत्रात लिहिली ... वाह मनोज वाह ............. असा मित्र असण्यापेक्षा दुश्मन परवडले ना .............!!! त्या मुलीने ते पत्र तीच्या आईला दाखवले. त्याच्या आईने शाळे मध्ये येउन त्या मनोज च्या एक मस्त पैकी कानाच्या खाली भडकावली आणि मुख्याध्यापक गुरुजीं कड़े घेउन गेली. सर्व वर्ग शांत होता कोणाला काही कळलेच नाही काय घडले ते .....थोड्या वेळाने शिपाई वर्गात येउन दिनु कोण आहे म्हणुन विचारले... आपला दिनु बाळ तर थंडच पडले ...........दिनु म्हणाला ''मी आहे काय झाले?''.... शिपाई म्हणाला '' तुला मुख्याध्यापक सरांनी बोलावले आहे ... आइंग................. आता मी काय केले असा प्रश्न त्याला पडला त्याला वाटले रश्मी बद्दल तर नाही ना बोलावले आपल्याला .... पण कसे शक्य आहे मी तीला कधी त्रास नव्हता दीला, काही बोललो पण नाही, मग कश्याला बोलावले असणार मला ... विचारांचे थैमान साचले होते त्याच्या मनात ..... दिनु सरांसमोर उभा राहिला मान खालीच होती त्याची ... सरांनी दिनुला विचारले, ''ही कविता तुझी आहे का?''............. आईला दिनु च्या खालची ज़मीन सरकली हे कसे झाले नंतर त्याला समजले की हा झोल मनोज चा आहे म्हणुन.
दिनु ने मान हलवून होकार दीला आणि सरांना खरे खरे सांगितले की कविता माझी आहे पण हा प्रकार काय आहे ते मला नाही माहीत. तरी सरांना दिनु चे बोलणे पटले नाही कारण मनोज ने खोते सांगितले होते की ती कविता त्याला दिनु ने दिली होती ... वाह मनोज वाह ........ काय दोस्ती आहे ही!!! त्या मनोज मूळे बिच्चारा दिनु पण काहीही न करता उगाचच नको त्या प्रकरणात अडकला होता ... सरांनी दिनु ला पालकांना घेउन यायला सांगितले तसे दिनु आईला घेउन गेला होता .... त्याच्या आईला दिनुची कविता लिहिण्याची सवय माहीत होती पण एव्हढी गंभीर गोष्ट घडेल असे तीला कधी वाटले नव्हते. दिनुला खूप ओरडा पडला घरच्यांचा आणि अभ्यासात पूर्ण लक्ष्य घालण्याची ताकीद मिळाली. आईने त्याची कवितांची वही पण फाडून टाकली सरां समोर त्याला खूप वाईट वाटले राग पण आला पण करणार काय?........... काहीच नाही मग गप्प बसा आता काहीच नाही करायचे ... त्यामूळे त्याने रश्मी चा विषय पण बाजुला ठेवायचे ठरवले ............. काय करणार नाहीतर दूसरी कसली पंचाईत व्हायची आणि भलताच लफडा व्हायचा ना .........
कसे बसे करत वार्षिक परीक्षा उलटली आणि सुट्ट्या सुरु झाल्या मे महिन्याच्या पण आपला दिनु बाळ जैसे थे ....!!!! मे महिन्या मध्ये आपला दिनु बाळ गावी गेला खूप आंबे खाल्ले आणि बरोबरच्या चुलत भावांबरोबर खेळन्यात रममाण झाला, त्याची आजी आणि चुलता हे गावी रहायचे. पण त्याच्या वडिलांच्या आग्रहा वरुण ते दोघे त्यांच्या बरोबर मुंबई ला यायला तयार झाले. दिनुला एक काका आणि ४ आत्या होत्या. एकून ६ भावंडे होती त्याचे पप्पा पकडून, तसे त्यांचे कुटुंब मोठेच होते.
आता सुट्टी संपत आली होती ना मग दिनुला परत शाळेचे वेध लागले आणि त्याच्या प्रियतमेचे रश्मीचे.... आता आपला दिनु बाळ नववी ला जाणार होता ना..................... सगळे मुंबई ला आले आणि परत दिनक्रम सुरळीत पणे सुरु झाला होता. पण दिनु आपला बेचैन होता .
Monday, September 28, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)

6 comments:
Pudhe kaay jhlae dosta?..aamhi pan bechain ahot
hi gosht tevach ka nahi sangitali...........ka lapavalis sarvanpasun.......changala dhada shikvala asta................mag pudhe kay ghadale............ toch parat dost ka.........
tujhe evhdhe prem hote rashmi var
waah dinu u r great
bichara dinnuuuuuu
DD sahyadri var sonpawal seriel madhe dinuchi chi shala ha show baghitla ..Tyach video show nhi ka tumchyakade? Sonpawal serial madhl..#rajatgaidhane9@gmail.com email contact
Majhykde Dinuchi shala By vyankatesh madgulkar story ahe
Post a Comment