आता आली सुट्टी दिवाळीची आता त्याला तग मग लागुन राहिली होती की रश्मी ला कसे भेटायचे कसे आणि मुख्य म्हणजे बघायचे कसे ..............??
त्याची तग मग बघून त्याचा एक मित्र पुढे आला त्याला मदत करण्यासाठी त्याचे नाव होते राजेश कड. पण तो पण त्याला जास्त मदत करू शकत नव्हता, कारण ती त्याच्या घरापासून जवळच रहायची ती........... मग काय दिनु खुश होता परत की कोणी तरी मदतीला आहे म्हणुन. दिनु रोज राजेश च्या घरी जाऊ लागला आणि त्याच्या बरोबरीने रश्मी ला चोरून पाहू लागला. हे आता रोजचेच झाले होते. रश्मीला पण आता हळू हळू आता हे सर्व कळू लागले होते, पण ती काहीच बोलायची नाही कशी बोलणार ती पण लहान होती तशी.... सातविला तर होती....!!!
आता आपला दिनु बाळ कविता करू लागला होता......... काय आश्चर्याचा धक्का बसला का?.......... हो हे खरे आहे दिनु आठवी पासूनच कविता करू लागला होता... दिनुची पहिली कविता त्याने अतिशय मन लावून लिहिली होती... अतिशय प्रेमाने.......... वाह काय प्रेम होते ते आणि काय दिवस होते ते........
हे डोळे तुझे शराबी
हे ओठ तुझे गुलाबी!
हे गोरे गोरे अंग
जसा गुलाबाचा गंध!!!
हे हात जणू कमलपात्र
तुज पाहता दीपती नेत्र!
तुझी शुभ्र कांति बघुनी
घायाळ होतो मी मनोमनी !!!
सहवास कसा होईल प्राप्त
कधी होईन मी तृप्त!
लागला मज तुझाच ध्यास
ना कळे कसला हव्यास !!!
भाव मनातले उलगडू कसे?
तुज सवे मी सांगू कसे?
माझे प्रेम तीला कळेल का?
प्रीत मला मिळेल का?
कशी वाटली ही दिनुची पहिली वाहिली कविता ...........??? मला माहीत आहे की थोडी वाकडी तिकडी आहे पण आहे तशी मांडली आहे ........... त्यानंतर त्याने खूप कविता लिहिल्या ..... पण एक चूक केलि .......... त्याने कधी त्याच्या कविता संग्रहीत करून ठेवल्या नाहित ...........ही त्याची चूक मोठी अशी नव्हती पण चूक ही चूक असते ना.......!!!
त्याच्या कविता त्याच्या मित्रांना पण तो वाचून दाखवू लागला. त्यांना पण आवडल्या काही आणि काहींनी त्यांच्या खोडकर सवयी मूळे त्याची टिंगल मस्करी केली ........... पण हार मानेल तो दिनु कसला .....!!!!
आपला दिनु तसा फार शांत होता, पण जर भडकला ना तर त्याला पण समजायचे नाही की तो काय बोलतोय आणि काय करतोय याची तो कल्पना पण नाय करू शकत होता आणि आपण ही ती ना केलेलीच बरी ......... पुढे कळेलच तुम्हाला ते.................!!!
Sunday, September 27, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)

6 comments:
are dinu bala, tiche naav, Rashi na??
mag prit ka lihito, rashmi lihi ki....
sahi ahe
kavita tu kelis ka bani banayi dhapalis kuthun ... zakkas
@ bhalchandra
mitra hee kavita maazhich aahe re
हे डोळे तुझे शराबी
हे ओठ तुझे गुलाबी!
हे गोरे गोरे अंग
जसा गुलाबाचा गंध!!!
chhaan aahe kavita tujhi mast aahe
ashi shabda rachna kashi kaay jamte re toola
mast kavita aahe
Post a Comment